गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

|| असा तिचा ||

|| असा तिचा ||
==========
असा तिचा हट्ट होता
जरा निगरगट्ट होता..
बहरलेल्या लेखणीचा
कागद जरा मठ्ठ होता..!!
******$p............😊

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

|| बीज ||

|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
🌺=============🌺
पाषाणावरही बीज रुजते
मूळ त्यासही घट्ट बिलगते..
औट घटकेच का होईना
सुंदर जीवन ते जगते..!!
****सुनिल पवार....

मंगळवार, १२ जुलै, २०१६

:::II मन अंबर II:::

:::II मन अंबर II:::
===========
भरून आले मन अंबर
कोरडी विहीर भरू पाहते..
पापण्यांच्या पागोळ्यातुन
मन पाऊस होऊन वाहते..!!
******सुनील पवार.....

II असली सोना II


असली सोना..

मिट्टी से ही मिलता सोना
उस सोने से क्या लगाव रखना..
मिट्टी होती है असली सोना
मिट्टी से ही मिलता खाना..!!
--सुनिल पवार..

|| छत्री ||

|| छत्री ||
======
काळी कलूटी गेली
रांगोटी फासुन आली...
कालची बेढब छत्री
आता झिरो फिगर झाली..!!
😀😜चकोर😀😜

ज्याला त्याला वाटे

ज्याला त्याला वाटे..

या जगाच्या बाजारी..
दुःखास कोण विचारी..?
ज्याला त्याला वाटे..
आपलेच दुःख भारी..!!
--सुनील पवार..

बुधवार, १५ जून, २०१६

|| चटका ||

|| चटका ||
=======
इतरांसाठी असेलही कदाचित
मुड़दे जळतात प्रकाश देतात..पण
विचारा त्या जवळच्याला सांगेल तो
मुड़दे जळतात चटकेच देतात..!!😊
*****सुनिल पवार....