चारोळी चकोर
शुक्रवार, ८ जून, २०१८
|| हळवा थेंब ||
|| हळवा थेंब ||
==========
प्रत्येक मनात असतो
पाऊस दाटलेला..
आठवणींच्या पानास
हळवा थेंब खेटलेला..!!
***सुनिल पवार....
✍🏼
स्वप्न
🌛
*शुभरात्री*
🌜
==========
का लपला चंद्र आज
कृष्णमेघांच्या मागे..?
मिटलेल्या नयनांतून
स्वप्न अजून जागे..!!
**सुनिल पवार...
✍🏼
|| पावसा ||
|
| पावसा ||
=======
होरपळलेल्या मनावर
तू थेंब शिंपडलेस पावसा..
अन काळजावर उमटला
मोरपिसाचा मोहक ठसा..!!
**सुनिल पवार..
✍🏼
|| तू आलास ||
तू आला अन्
गंध मातीचा
श्वासास बिलगला..
तू आला अन्
क्षण ओला झाला..!!
--सुनिल पवार..
✍🏼
|| नियती ||
|| नियती ||
=======
नियती जुळवून आणते संयोग
कोणी निमित्त त्यास मात्र होतो..
नियतीच्या या नीतीचा प्रत्यय
नकळत आपणास होत असतो..!!
***सुनिल पवार...
✍🏼
🌻
सुप्रभात
🌻
शुभ सकाळ
🌻
|| मन ||
|| मन ||
=====
मौनातही मन बोलते
भाव केवळ मन जाणते..
मौनातल्या भावातही
मन मोकळे होऊन जाते..!!
***सुनिल पवार....
✍🏼
🌛
*शुभरात्री*
🌜
वेलबुट्टी
झावळ्यांनी रेखाटली
वर्तुळाकार नक्षी..
श्रीफळांची वेलबुट्टी
शोभते कल्पवृक्षी..!!
**सुनिल पवार..
✍🏼
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)