शुक्रवार, ८ जून, २०१८

वेलबुट्टी

झावळ्यांनी रेखाटली
वर्तुळाकार नक्षी..
श्रीफळांची वेलबुट्टी
शोभते कल्पवृक्षी..!!
**सुनिल पवार..✍🏼

शनिवार, २६ मे, २०१८

· || सोहळा ||

· || सोहळा ||
========
कल्पवृक्षाच्या झावळ्या
कौतुके पाहती सोहळा..
आभाळात जमून आला
काळ्या मेघांचा गोतावळा..!!
***सुनिल पवार...✍🏼
(माझी मोबाईल फोटोग्राफी)

हे चंद्रा


|| शुभरात्री ||
========
या संध्येचे किती मोहक रंग क्षितिजात..
हे चंद्रा जीव गुंतला तुझ्या मुखड्यात..!!
***सुनिल पवार....

फुले चाफ्याची.

|| सुप्रभात ||
=========
कोणी अंथरली फुले चाफ्याची..?
अवतरली प्रसन्न पहाट सोन्याची..!!
**सुनिल पवार..✍🏼

शुक्रवार, २० एप्रिल, २०१८

!! जय भवानी जय शिवाजी !!

 
!! जय भवानी जय शिवाजी !!
===================
महाराष्ट्र भूमीशी राखतो ईमान
ही मराठी बोली आमची शान
शत शत नमन तुम्हास राजे
तुम्हीच आमचा सार्थ अभिमान...!!
***सुनिल पवार...✍🏼

|| घे जाणून ||

|| घे जाणून ||
========
तू मागितली प्रेम कविता
मी तर वाहिले पुष्प तुला..
वाच ना माझे नयन जरा
अन जाणून घे कवितेला..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| ज्योतिबाची ज्योत ||

|| ज्योतिबाची ज्योत ||
============
तुम्ही प्रज्वलित केली ज्योत
अजूनही प्रखर तेवते आहे..
शिकली सावरली सावित्री
साऱ्या जगास उजळते आहे..!!
***सुनिल पवार...✍🏼
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🏼