गुरुवार, २८ जून, २०१८

|| नियती ||

|| नियती ||
=======
नियतीच्या नित्य खेळाला
कोणी कधी जाणले आहे..??
कोरड्या पाषाणाच्या डोळा
नियतीने पाणी आणले आहे..!!
***सुनिल पवार..✍🏼
🌻सुप्रभात🌻शुभ सकाळ🌻

II एक झाड लाव अंगणी II

II एक झाड लाव अंगणी II
================
नको ओरबाडू झाडास
ऐक पक्षांची दीन वाणी..
तू सावित्री,तू सुवासिनी
एक झाड लाव अंगणी..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| पाऊस ||

|| पाऊस ||
=======
बाहेर कोसळणारा हा पाऊस
आता अंतरातही थैमान मांडतो..
तो तिथे सांडतो, मी इथे सांडतो
कोणाची व्यथा सांग कोण मांडतो..??
***सुनिल पवार..✍🏼

|| हळव्या वेदनेला ||

|| हळव्या वेदनेला ||
=============
मनाच्या हळव्या वेदनेला
औषध तरी कोणते लावावे..
कितीशी मात्रा वापरावी अन्
शब्द असे कोणते उगाळावे..!!
***सुनिल पवार..✍🏼
(आगामी "वळणावरच्या वाटा" मधून)

शनिवार, २३ जून, २०१८

|| घे जगून ||

|| घे जगून ||
=========
घे जगून तू मुक्त मित्रा
आयुष्याचे क्षण हे चार..
हात मोकळे राहतील अन् 
मागे उरतील केवळ विचार..!!
***सुनिल पवार...✍🏼

II दुःख II


🙂 *सुप्रभात शुभसकाळ* 🙃
=====================
दुःख सहसा कोणासमोर उगाळू नको
लोक सुंगध घेतील अन् निघून जातील..!!
***सुनिल पवार...✍🏼

II गुलाब II

तसं गुलाबाचं फुल हे
काट्यांनी मढलेले..
कोणाचं तरी त्यावर
निस्सीम प्रेम जडलेले..!!
**सुनिल पवार...✍🏼