गुरुवार, २८ जून, २०१८

|| हळव्या वेदनेला ||

|| हळव्या वेदनेला ||
=============
मनाच्या हळव्या वेदनेला
औषध तरी कोणते लावावे..
कितीशी मात्रा वापरावी अन्
शब्द असे कोणते उगाळावे..!!
***सुनिल पवार..✍🏼
(आगामी "वळणावरच्या वाटा" मधून)

शनिवार, २३ जून, २०१८

|| घे जगून ||

|| घे जगून ||
=========
घे जगून तू मुक्त मित्रा
आयुष्याचे क्षण हे चार..
हात मोकळे राहतील अन् 
मागे उरतील केवळ विचार..!!
***सुनिल पवार...✍🏼

II दुःख II


🙂 *सुप्रभात शुभसकाळ* 🙃
=====================
दुःख सहसा कोणासमोर उगाळू नको
लोक सुंगध घेतील अन् निघून जातील..!!
***सुनिल पवार...✍🏼

II गुलाब II

तसं गुलाबाचं फुल हे
काट्यांनी मढलेले..
कोणाचं तरी त्यावर
निस्सीम प्रेम जडलेले..!!
**सुनिल पवार...✍🏼

|| निशा ||

|| निशा ||
======
तू येतेस अन्
अंगणात रातराणी दरवळते
चंद्राच्या साक्षीने
चांदण्यांची मैफिल सजते..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| आरसे ||

 || आरसे ||
=======
कितीदा पाहिले
नाही मन भरले
जसे आरसे झाले..!!
**सुनिल पवार...✍🏼

चार ओळींचा पाऊस

चार ओळींचा पाऊस..

चार ओळींचा पाऊस
लेखणीतून पाझरला..
पागोळ्यातून ओघळत
आठवणीस बिलगला..!!
--सुनिल पवार..✍🏼