चारोळी चकोर
सोमवार, २४ डिसेंबर, २०१८
ll कधी कधी ll
कधी कधी
कोणाला समजून घेण्यासाठी
शब्दांना सहज फिरवावे लागते..
काही जणांना ते समजत नाही
त्यांना चुचकारून भरवावे लागते..!!
***सुनिल पवार...
✍️
ll बोलाची कढी ll
बोलाची कढी...
😄
बोलणे सहज सुलभ असते
पण निभावणे तितकेच कठीण..
धरणीला आभाळ नेहमीच म्हणते
मी क्षितिजात तुला भेटेन..!!
***सुनिल पवार....
✍🏼
ll शीत लह ll
|| सुप्रभात || शुभ सकाळ ||
दवात भिजलेली
शुभ्र धुक्याची चादर..
शिशिरात रोमांचित
पहाटेची शीत लहर..!!
**सुनिल पवार...
✍️
ll रात्र ll
रात्र सुखनैव होण्यासाठी
निद्रेच्या आधीन होऊया..
स्वप्न सत्यात उतरण्यासाठी
आधी स्वप्न तर पाहूया..!!
🌛
शुभरात्री......
🍁
सुनिल पवार...
✍️
ll प्रवास ll
प्रवास...
छोटासा एक कवडसा
बाकी अंधार भरलेला..
कुठे चाललो कळेना
तरीही प्रवास ठरलेला..!!
***सुनिल पवार....
✍🏼
ll दिल ll
तुटे हुए..
*टूटे हुए आईने में लोग तस्वीर नही देखते*
*मगर टूटे दिल मे प्यार देखा जा सकता है..!!*
***सुनिल पवार...
✍🏼
ll तू भेटलीस ll
एक ओळ...
☝️
तू भेटलीस अन् मी हरवलो..!!
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)