तुजसाठीच वाटे..
तुजसाठीच वाटे सजावे धजावे
तव शब्दांचे तनुवर मोरपीस फिरावे..
स्पर्श नजरेचा मन मोहरून जावे
अन् क्षणाने घ्यावे क्षणाचे विसावे..!!
--सुनील पवार..
तुजसाठीच वाटे..
तुजसाठीच वाटे सजावे धजावे
तव शब्दांचे तनुवर मोरपीस फिरावे..
स्पर्श नजरेचा मन मोहरून जावे
अन् क्षणाने घ्यावे क्षणाचे विसावे..!!
--सुनील पवार..
आयुष्याचे गणित..
वाट ..
दूरवर जाणारी वाट
आपणास धूसर दिसत असते
पण तिथवर गेल्यावर कळते
ती तशी कधीच नसते।
--सुनील पवार..✍🏼
🌻सुप्रभात🌞शुभ सकाळ🌻
गुरू परब्रह्म परमेश्वर..
गुरुस जो गर्वित करतो
शिष्य तो खरा महान असतो।
गुरू परब्रह्म परमेश्वर
सर्व समस्यांचे समाधान असतो।
--सुनील पवार..✍🏼
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
दुधगंगेची सैर करून
सांजेला चंद्र उगवला।
भास्कर चकित झाला
अंमळ लवकर मावळला।
--सुनील पावर..
तुम्हारी तरह..
तुम्हारी तरह ही
मुझे नींद आती नही।
मगर
हम दोनों में फर्क इतना है की
मैं अकेला
और तुम्हारे इर्दगिर्द
सितारे है कईं।
--सुनील पवार..
भिंत मनाची..
भिंत मनाची अस्ताव्यस्त
आता सावरायला हवी।
जळमटे मनाची साफ करून
नव्याने रंगवायला हवी।
--सुनील पवार..